नवी दिल्ली : ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाची लवकरच सुरूवात होत आहे. यंदाचा महिला ट्वेंटी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. भारतीय महिला संघ आगामी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. नुकताच भारताच्या अंडर-19 महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होईल. सर्व सामने दक्षिण आफ्रिकेच्या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील. केपटाउन, पार्ल आणि गेबेरा या मैदानांवर हे सामने पार पडतील.
गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ गट 1 मध्ये असून कांगारूच्या संघाला 11 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. गट 2 मधील दुसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. खरं तर दोन गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचे सामने 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारीपासून सुरू होतील. दुसरीकडे, स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
विश्वचषकासाठी दोन गट खालीलप्रमाणे -
- गट 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश.
- गट 2 - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड.
स्पर्धेचे वेळापत्रक -
- 10 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - केपटाऊन
- 11 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड - पार्ल
- 11 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - पार्ल
- 12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन
- 12 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - केपटाऊन
- 13 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड - पार्ल
- 13 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड - पार्ल
- 14 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - गेबेरा
- 15 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - केपटाऊन
- 15 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड - केपटाऊन
- 16 फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया - गेबेरा
- 17 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - केपटाऊन
- 17 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड - केपटाऊन
- 18 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध भारत - गेबेरा
- 18 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया - गेबेरा
- 19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज - पारल
- 19 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - पारल
- 20 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध भारत - गेबेरा
- 21 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन
- 21 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - केपटाऊन
नॉकआउट सामने -
- 23 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 1 - केपटाऊन
- 24 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 2 - केपटाऊन
- 26 फेब्रुवारी - अंतिम सामना - केपटाऊन
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Women T20 World Cup 2023 starts from February 10 and India vs Pakistan match on 12th, know here full schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.