महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा कुठे होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नियोजित वेळापत्रकानुसार बांगलादेशात ही स्पर्धा होणार होती. मात्र, तेथील वातावरण, हिंसेची आग आणि जाळपोळीच्या घटनांमुळे बांगलादेशात स्पर्धा होणे शक्य नाही. त्यामुळे आयसीसी इतर देशात स्पर्धा भरवण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हिंसाचारामुळे महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे आयोजन धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ही स्पर्धा इतरत्र हलवण्याचा विचार करत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने बांगलादेशातील सद्य स्थितीवरून नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियन मीडियाने ॲलिसा हीलीचा हवाला देत म्हटले की, आताच्या घडीला बांगलादेशात खेळण्याचा विचार करणे देखील कठीण आहे. एक नागरिक म्हणून मला असे वाटते की, तिथे स्पर्धा भरवणे खूप चुकीचे ठरेल. खरे तर बांगलादेशमध्ये जून महिन्यापासून हिंसाचार सुरू झाला होता आणि त्यानंतर ही आग संपूर्ण देशभरात पसरली. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आणि हजारो लोक जखमी झाले. भारतात विश्वचषकाची स्पर्धा होईल अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयने याला नकार दर्शवला. त्यामुळे यूएईत स्पर्धेचा थरार रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल, असे नियोजित आहे.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया