women t20 world cup 2024 : आजपासून भारताचा महिला क्रिकेट संघ ट्वेंटी-२० विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. तीन तारखेपासून महिलांच्या विश्वचषकाला सुरुवात झाली असून, शुक्रवारी भारत आपला सलामीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. टीम इंडियाला अद्याप एकदाही या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघावर मोठी जबाबदारी आहे. सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना एक सरप्राईज मिळाले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आपल्या कुटुंबीयांचा व्हिडीओ पाहून खूप भावनिक झाली. तिचे आई-वडील आणि भावाने तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या भावाने विनोदी शैलीत काही सल्ले देखील दिले. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील तिला तिच्या कुटुंबाकडून मिळालेल्या संदेशांचा आनंद घेत होती, ज्यामध्ये तिच्या आईने विश्वास व्यक्त केला की हरमनप्रीत तिच्या संघाचे चांगले नेतृत्व करेल आणि ट्रॉफीसह भारतात परतेल.
विश्वचषकासाठी भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.
भारताचे वेळापत्रक - ४ ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी ३.३० वाजल्यापासून९ ऑक्टोबर - विरुद्ध श्रीलंका, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१३ ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना१८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना२० ऑक्टोबर - अंतिम सामना