women t20 world cup 2024 : जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. मोठ्या कालावधीनंतर भारतात आयसीसीची ट्रॉफी आल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. आता चार महिन्यांनंतर भारताचा महिला क्रिकेट संघ विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळत आहे. तीन तारखेपासून महिलांच्या विश्वचषकाला सुरुवात झाली असून, शुक्रवारी भारत आपला सलामीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. टीम इंडियाला अद्याप एकदाही या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघावर मोठी जबाबदारी आहे.
रोहित शर्माने जे ध्येय गाठले तेच ध्येय आमचेही असल्याचे हरमनप्रीतने सांगितले. महिलांचा ट्वेंटी-२० विश्वचषक म्हणजे आमच्यासाठी एक मोठी संधी आहे. पुरुष संघाने मिळवलेला विजय प्रेरणादायी असून, आमची चांगली तयारी झाली आहे. संघातील सकारात्मक वातावरणाचा नक्कीच फायदा होईल. ही स्पर्धा एक चांगली संधी असल्याचे आम्ही नेहमीच ड्रेसिंग रुममध्ये बोलत असतो, असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नमूद केले. ती 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होती.
विश्वचषकासाठी भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.
भारताचे वेळापत्रक - ४ ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी ३.३० वाजल्यापासून९ ऑक्टोबर - विरुद्ध श्रीलंका, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१३ ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना१८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना२० ऑक्टोबर - अंतिम सामना