women t20 world cup 2024 time table : तीन ऑक्टोबरपासून यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. महिला विश्वचषकात चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दहा देशांचा समावेश आहे. सलामीचा सामना ३ ऑक्टोबर तर अंतिम सामना २० ऑक्टोबरला होईल. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांकडे पाहिले जात आहे. पण, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडिया विश्वचषकाच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल. अनुभवी खेळाडूंची फळी असलेल्या भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असेल. कांगारुंनी सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकला आहे.
भारताचे वेळापत्रक - ४ ऑक्टोबर - विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर - विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी ३.३० वाजल्यापासून९ ऑक्टोबर - विरुद्ध श्रीलंका, दुबई, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१३ ऑक्टोबर - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१७ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना१८ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना२० ऑक्टोबर - अंतिम सामना
दरम्यान, BCCI ने जाहीर केलेल्या भारताच्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अलीकडेच ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारतीय चाहते विश्वचषकाची स्पर्धा स्टार स्पोर्ट्स आणि डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकतात.
विश्वचषकासाठी भारताचा संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.