सिडनी : आॅस्ट्रेलियाची मधल्या फळीतील फलंदाज एलिस पेरी हिने इंग्लंडविरुद्ध एकमेव अॅशेस कसोटीत नाबाद २१३ धावांची विक्रमीखेळी केली. तिच्या विक्रमी खेळीच्या बळावर इंग्लंडच्या पहिल्या डावात २८0 धावांच्या प्रत्युत्तरात आॅस्ट्रलियाने १६६ षटकांत ९ बाद ४४८ धावसंख्येवर डाव घोषित केला. दिवसअखेर इंग्लंड संघाने बिनबाद ४0 धावा केल्या आहेत.कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वात जास्त धावा करणाºया फलंदाजांच्या यादीत आता पेरी ही तिसºया क्रमांकावर पोहोचली आहे, तसेच अॅशेस कसोटीत आणि आॅस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावांची खेळी करणारी ती पहिली महिला फलंदाज आहे. आॅस्ट्रेलियाच्या पेरी हिने स्फोटक फलंदाजी करताना ३७४ चेंडूंत २७ चौकार व एका षटकारासह नाबाद २१३ धावांची खेळी केली. तिला आणखी फलंदाजीची संधी दिली असती तर कदाचित ती पाकिस्तानच्या किरण बलूच हिचा वर्ल्डरेकॉर्ड तोडू शकली असती. बलूचने २४२ धावांची खेळी केली होती.द्विशतक ठोकणारी ७ वी फलंदाजपेरी कसोटीत द्विशतक झळकावणारी ७ वी फलंदाज ठरली असून, अशी कामगिरी करणारी ती आॅस्ट्रेलियाची चौथी फलंदाज आहे. त्याआधी आॅस्ट्रेलियाकडून कॅरेन रॉल्टनने नाबाद २0९, मिशेल गोज्को हिने २0४ आणि जॉने ब्रॉडबेंट हिने २00 धावा केल्या होत्या.संक्षिप्त धावफलकइंग्लंड : पहिला डाव : २८0. दुसरा डाव : बिनबाद ४0.आॅस्ट्रेलिया : पहिला डाव: ९ बाद ४४८ (घोषित) : (पेरी नाबाद २१३, मॅकग्रा ४७, मार्श ३/१0९).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महिला अॅशेस कसोटी : आॅस्ट्रेलियाच्या पेरीचे विक्रमी द्विशतक, नाबाद २१३ धावांची खेळी
महिला अॅशेस कसोटी : आॅस्ट्रेलियाच्या पेरीचे विक्रमी द्विशतक, नाबाद २१३ धावांची खेळी
आॅस्ट्रेलियाची मधल्या फळीतील फलंदाज एलिस पेरी हिने इंग्लंडविरुद्ध एकमेव अॅशेस कसोटीत नाबाद २१३ धावांची विक्रमीखेळी केली. तिच्या विक्रमी खेळीच्या बळावर इंग्लंडच्या पहिल्या डावात २८0 धावांच्या प्रत्युत्तरात आॅस्ट्रलियाने १६६ षटकांत ९ बाद ४४८ धावसंख्येवर डाव घोषित केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:44 AM