INDW vs SLW: ११ चौकार आणि १ षटकार! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान 

बांगलादेशच्या धरतीवर आजपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 02:39 PM2022-10-01T14:39:59+5:302022-10-01T14:40:09+5:30

whatsapp join usJoin us
Women's Asia Cup 2022 India target to Sri Lanka by 151 runs for victory thanks to Jemimah Rodriguez's half-century  | INDW vs SLW: ११ चौकार आणि १ षटकार! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान 

INDW vs SLW: ११ चौकार आणि १ षटकार! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women’s Asia Cup 2022 । सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर आजपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. पहिल्याच सामन्याच स्पर्धेचा प्रबळ दावेदार भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आहेत. बांगलादेशच्या यजमानपदात सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket stadium) ही स्पर्धा खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार फलंदाजी करून श्रीलंकेसमोर १५१ धावांचे आव्हान ठेवले आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १५० एवढी धावसंख्या उभारली. 

जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक
तत्पुर्वी, श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघास प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर स्मृती मानधना संघाच्या अवघ्या १३ धावा असताना बाद झाली, तर २३ धावा असताना शेफाली वर्माच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमा रॉड्रिग्जची साथ दिली. मात्र कौर ३० चेंडूत ३० धावा करून बाद झाली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ५३ चेंडूत ७६ धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये फलंदाजीला आलेली रिचा घोष अवघ्या ९ धावांवर ओशाडी रणसिंगे हिची शिकार झाली. लक्षणीय बाब म्हणजे जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार ठोकून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. 

श्रीलंकेकडून ओशाडी रणसिंगे हिने ३ बळी पटकावले तर सुगंधिका कुमारी आणि चामरी अथपथु या दोघींना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. या दोघींना वगळले तर कोणत्याच श्रीलंकन गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, दयालन हेमलता, पूजा वेस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका ठाकूर. 

७ संघांमध्ये रंगणार 'सामना' 
आजपासून अर्थात १ ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. 


 

Web Title: Women's Asia Cup 2022 India target to Sri Lanka by 151 runs for victory thanks to Jemimah Rodriguez's half-century 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.