women's asia cup 2024 : महिलांच्या आशिया चषकाची स्पर्धा यंदा श्रीलंकेच्या धरतीवर होणार आहे. या महिन्यात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे असेल. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेतील सर्व सामने चाहत्यांना मोफत पाहता येणार आहेत. चाहते मैदानात जाऊन मोफत हे सामने पाहू शकतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा करताना चाहत्यांना ही खुशखबर दिली.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.
भारत या स्पर्धेसाठी अ गटात आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होईल. १९ जुलै रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होईल, तर भारताचा दुसरा सामना २१ जुलैला यूएईसोबत होईल. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडिया २३ जुलै रोजी नेपाळशी भिडेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवले जातील.
आशिया चषकातील भारताचे सामने -
१९ जुलै - भारत विरूद्ध पाकिस्तान
२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई
२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ
Web Title: women's Asia Cup 2024 to be held in Sri Lanka can be watched for free Announcement of Sri Lanka Cricket Board
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.