Join us  

WPL vs PSL: 'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ

यंदाच्या वर्षापासून रंगणार महिला IPL, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:34 PM

Open in App

WPL vs PSL: BCCI च्या महिला प्रीमियर लीगच्या पाचही संघांची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या संघांच्या लिलाव प्रक्रियेत BCCI ने पाच संघांना ४,६७० कोटींना विकले. महिला प्रीमियर लीगचा सर्वात महागडा संघ १,२८९ कोटी रुपयांना विकला गेला. तर सर्वात स्वस्त संघ ७५७ कोटी रुपयांना विकला गेला. महिला प्रीमियर लीगच्या या लिलावाने IPL 2008 चा देखील विक्रमही मोडला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा सर्वात महागडा संघदेखील भारताच्या महिला आयपीएल समोर कुठेही टिकत नाही, हे स्पष्ट झाले.

पाकिस्तान सुपर लीगचे संघ किती किमतीत विकले गेले आणि ते भारताच्या महिला प्रीमियर लीगसमोर कुठे दिसतात, ते आपण जाणून घेऊया.

PSL चे आर्थिक गणित कायमच फसलंय!

पाकिस्तान सुपर लीग पैशाच्या बाबतीत महिला प्रीमियर लीगच्या पुढे कुठेही टिकू शकत नाही. २०१५ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे पाच संघ ९३ दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. यानंतर, २०१९ मध्ये, या लीगचा सहावा संघ ६.३५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकला गेला. PSL च्या सर्व 6 संघांची एकूण किंमत 100 दशलक्ष डॉलर्स देखील नाही. आणि जरी या लीगच्या सर्व संघांचे आजच्या डॉलरच्या दरानुसार पाहिले तर या लीगच्या सर्व ६ संघांचे एकूण मूल्य महिला IPL लीगच्या एका संघाच्या बरोबरीचेही नाही.

कोणता PSL संघ किती किमतीला विकला गेला?

  • कराची किंग्ज - $26 दशलक्ष
  • इस्लामाबाद युनायटेड संघ - $15 दशलक्ष
  • मुलतान सुलतान - $6.35 दशलक्ष
  • लाहोर कलंदर - $25.1 दशलक्ष
  • पेशावर झल्मी - $16 दशलक्ष
  • क्वेटा ग्लॅडिएटर्स - $11 दशलक्ष

 

महिला प्रीमियर लीग संघांची किंमत

  • अहमदाबाद: १२८९ कोटी
  • मुंबई : ९१२.९९ कोटी
  • बेंगळुरू: ९०१ कोटी
  • दिल्ली: ८१० कोटी
  • लखनौ: ७५७ कोटी
टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानआयपीएल २०२२
Open in App