Join us  

महिला आयपीएल : खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार

Women's IPL: महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)च्या पहिल्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये लिलावाचा सोहळा रंगू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 6:13 AM

Open in App

नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)च्या पहिल्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये लिलावाचा सोहळा रंगू शकतो. यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. लिलावात पाच फ्रँचाइजी आपला संघ तयारी करण्यासाठी खेळाडूंवर बोली लावतील.नुकताच डब्ल्यूपीएलच्या संघाचा लिलाव झाला होता. ५ संघांना निवडण्यासाठी १७ कंपन्यांनी बोली लावली होती. त्यामध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या हाती प्रत्येकी एक टीम लागली. अन्य दोन संघ अदानी स्पोर्टस्लाईन आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग यांनी विकत घेतले. एकूण ४६७० कोटींनी हे पाच संघ विकले गेले.

बोलीसाठी प्रत्येक संघाकडे असतील १२ कोटीसंघाच्या लिलावानंतर आता खेळाडूंचा लिलाव पार पडेल. त्यासाठी प्रत्येक संघाला १२ कोटींची रक्कम निर्धारित करून देण्यात आली आहे. प्रत्येक संघ १५ ते १८ खेळाडू खरेदी करू शकतो.५ विदेशी खेळाडूंची मुभाअंतिम संघात ५ विदेशी महिला खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा संयोजकांकडून देण्यात आली आहे. पुरुषांच्या आयपीएलमध्ये ही मर्यादा ४ खेळाडूंची आहे. तसेच या पाच खेळाडूंमध्ये एक खेळाडू असोसिएट देशाचा असणे अनिवार्य आहे.

 अनकॅप्ड खेळाडूंची बेस प्राइस - १० आणि २० लाख रुपये कॅप्ड खेळाडूंची बेस प्राइस - ३०, ४० आणि ५० लाख रुपये

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)च्या पहिल्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये लिलावाचा सोहळा रंगू शकतो. 

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट
Open in App