Women's Premier League 2023 Auction: भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) मुंबई इंडियन्सला कडवी टक्कर देताना स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात करून घेण्यात यश मिळवले. महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ लिलावात बोली लागलेली ती पहिलीच खेळाडू होती आणि मुंबई इंडियन्सनेही तिच्यासाठी ३ कोटींपर्यंत बोली लावली होती.
स्मृती मानधना RCB ची कर्णधार बनणार? माईक हेसन यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स
महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पाच फ्रँचायझींनी ८७ खेळाडूंवर ५९.५० कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड केली होती, ज्यात २७० भारतीयांचा समावेश होता. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला आणि काही खेळाडू इतके श्रीमंत झाले की त्यांनी पुरुष क्रिकेटपटूंनाही मात दिली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमपेक्षास्मृती मानधनाचा पगार दुप्पट झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळतो आणि त्याला प्रत्येक हंगामात १.५० लाख डॉलर मिळत आहेत, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडूंना २ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळाली आहे. बाबरच नव्हे तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी यांना PSL मधून मिळणारा पगार २ कोटींपेक्षा कमीच आहे.
महिला प्रीमिअर लीगमध्य महागडे खेळाडू
- स्मृती मानधना ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ३.४० कोटी
- अॅश्ली गार्डनर ( गुजरात जायंट्स ) - ३.२० कोटी
- नॅट सीव्हर ( मुंबई इंडियन्स ) -३.२० कोटी
- दीप्ती शर्मा ( यूपी वॉरियर्स ) - २.६० कोटी
- जेमिमा रॉड्रिग्ज ( दिल्ली कॅपिटल्स) - २.२० कोटी
- बेथ मूनी ( गुजरात जायंट्स) - २ कोटी
- शेफाली वर्मा ( दिल्ली कॅपिटल्स) - २ कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Women's Premier League 2023 Auction: Babar Azam PSL Salary vs Smriti Mandhana WIPL Salary, Indian player earn double than pakistani captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.