Women's Premier League 2023 Auction: भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) मुंबई इंडियन्सला कडवी टक्कर देताना स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात करून घेण्यात यश मिळवले. महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ लिलावात बोली लागलेली ती पहिलीच खेळाडू होती आणि मुंबई इंडियन्सनेही तिच्यासाठी ३ कोटींपर्यंत बोली लावली होती.
स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा
इंडियन प्रीमिअर लीगच्या २००८च्या पहिल्या लिलावात ९.५ कोटींसह महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. महिला प्रीमिअर लीगमध्ये हा मान स्मृतीने पटकावला. स्मृतीचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या निता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात केली. दोन्ही फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने ११२ ट्वेंटी-२० सामन्यांत ११२च्या स्ट्राईक रेटने २६५१ धावा केल्या आहेत.
स्मृती मानधना RCB कडून खेळणार हे निश्चित झाल्यानंतर चाहते भलतेच खूश झाले. त्यात RCBचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी भारतीय संघाच्या उप कर्णधार स्मृतीला RCB चे कर्णधारपद देणार का, यावर स्पष्ट मत मांडले. ''स्मृती मानधनाकडे नेतृत्वाचा पुरेसा अनुभव आहे. ती भारतीय खेळाडू आहे आणि येथील परिस्थितीचा तिचा चांगला अभ्यास आहे. सध्याच्या घडीला कर्णधारपदाच्या शर्यतीत ती आघाडीवर आहे, परंतु संघ व्यवस्थापनाला या जबाबदारीसाठी वरिष्ठ खेळाडू हवा आहे. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले तीन खेळाडू आहेत,''असे हेसन म्हणाले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB's team for WPL )- स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Women's Premier League 2023 Auction: Smriti Mandhana to captain Royal Challenge Bangalore? Mike Hesson has the answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.