WPL 2025 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) गुरुवारी महिला प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गुजरात जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं स्पर्धेचा शुभारंभ होईल. सलामीची ही लढत बडोदा येथील मैदानात खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या मैदानात १३ मार्चला एलिमिनेटर आणि १५ मार्चला फायनल सामना खेळवला जाईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
५ संघ ४ शहरात खेळतील २२ सामने
महिला प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धेत पाच संघ सहभागी असून यंदाच्या हंगामात एकूण २२ सामने नियोजित आहेत. हे सामने मुंबई, लखनऊ, बंगळुरु आणि बडोदा या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. १४ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक ८ सामने हे बंगळुरुच्या मैदानात रंगणार असून बडोदा ६, लखनऊच्या मैदानात ४ लढती रंगल्याचे पाहायला मिळेल. मुंबईच्या मैदानात प्लेऑफशिवाय साखळी फेरीतील प्रत्येकी २-२ सामने खेळवले जाणार आहेत.