महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती

WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:44 PM2023-02-02T17:44:10+5:302023-02-02T17:44:29+5:30

whatsapp join usJoin us
Women’s Premier League Auction 2023: WPL Player Auction in Mumbai on February 13, around 1000 players register interest for 1st season, know all about auction, base price  | महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती

महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WPL Auction 2023: महिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. महिला प्रीमिअर लीगसाठीबीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्काच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. आता सर्व व्यासपीठ तयार झालेले असताना WPL ऑक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ फेब्रुवारीला मुंबईत हे ऑक्शन पार पडणार असल्याचा अंदाज आहे. 

महिला प्रीमिअर लीग ऑक्शनसाठी जवळपास  १००० खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. त्यामुळे WPL सुपर डुपर हिट होणार अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या प्रवासाची ही सुरुवात म्हणावी लागेल. ''महिला प्रीमिअर लीगच्या ऑक्शनसाठी जवळपास १००० खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. भारतीय आणि परदेशी खेळाडूंकडून या लीगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे,''असे सूत्रांनी सांगितले. राजस्थान रॉयल्सने सर्वात कमी १८० कोटींची बोली लावली. हल्दीरामने २४० कोटीं आणि कोलकाताने ६६६ कोटींची बोली लावली. 

  • WPL च्या लिलावात केवळ ९० खेळाडूंची निवड केली जाणार आहे
  • प्रत्येक संघाला १८ खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, १५० खेळाडूंचा एक संच असणार आहे
  • ५०, ४० व २० लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत
  • अनकॅप्ड खेळाडूसाठी १० ते २० लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल
  • प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्सची मर्यादा १२ कोटी ठेवण्यात आली आहे
  • महिला प्रीमिअर लीगसाठी पाच फ्रँचायझींनी मिळून ४६६९.९९ कोटी मोजले 
  • ४ ते २६ मार्च या कालावधीत महिला प्रीमिअर लीग होण्याची शक्यता

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Women’s Premier League Auction 2023: WPL Player Auction in Mumbai on February 13, around 1000 players register interest for 1st season, know all about auction, base price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.