WPL 2024 चा थरार महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? BCCI सचिव जय शहांचं मोठं विधान 

महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:21 PM2023-12-11T12:21:38+5:302023-12-11T12:22:16+5:30

whatsapp join usJoin us
women's premier league schedule BCCI Secretary Jai Shah said that there are several options for the venue of wpl 2024 which include Maharashtra, Gujarat, Bangalore and Uttar Pradesh |  WPL 2024 चा थरार महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? BCCI सचिव जय शहांचं मोठं विधान 

 WPL 2024 चा थरार महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? BCCI सचिव जय शहांचं मोठं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jay Shah on IPL and WPL start । मुंबई : आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत असून, शनिवारी यासाठी मुंबईत लिलाव पार पडला. काही नवख्या खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लागली, तर वृंदा दिनेश (१.३० कोटी) आणि काशवी गौतम (२ कोटी) या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. लिलाव पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना बीसीसीआय सचिव जय शहा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलचा थरार कधीपासून रंगणार याबाबत त्यांनी सूचक विधान केले. 

मार्च २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलला सुरूवात होईल आणि मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धेचा शेवट होईल, असे शहा यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२४ साठी दुबईत लिलाव पार पडणार आहे, ज्यासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. खरं तर पहिल्यांदाच भारताबाहेर लिलाव होत आहे. या लिलावात १० फ्रँचायझी २६२.९५ कोटी रूपये खर्च करतील आणि ११६६ खेळाडूंवर बोली लावतील. यातील एकूण ७७ खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये ३० परदेशी खेळाडू असतील. 

महिला प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामाबद्दल बोलताना जय शहांनी म्हटले की, २ किंवा ३ फेब्रुवारीपासून याची सुरूवात होईल. काही कारणांस्तव दुसरा हंगाम देखील एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय झाला आहे. भविष्यात ही स्पर्धा इतर शहरांमध्ये देखील खेळवण्याबाबत विचार सुरू आहे. बीसीसीआय आणि फ्रँचायझी यांच्यात याबाबत चर्चा सुरू असून, महिला प्रीमिअर लीगच्या स्थानाबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.

जय शहांनी सांगितले पर्याय
तसेच महिला प्रीमिअर लीगचा हंगाम कुठे खेळवावा याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी अनेक पर्याय देखील आहेत. महाराष्ट्रात पदार्पणाचा हंगाम खेळवला गेला. यंदा बंगळुरू (कर्नाटका) किंवा उत्तर प्रदेश हा पर्याय आहे. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, गुजरात जिथे अहमदाबाद आणि राजकोट येथेही हा थरार होऊ शकतो. याशिवाय काही वर्षांनी बडोदात पण स्टेडियम तयार असेल. मात्र, हा निर्णय बीसीसीआय आणि फ्रँचायझी मिळून घेतील. आम्ही एकत्र बसून यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. याबाबद्दल सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. पण आगामी हंगाम एकाच राज्यात खेळवला जाणार असल्याचे जय शहांनी सांगितले. 

यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू
काशवी गौतम (भारत) - २ कोटी 
ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) - २ कोटी 
वृंदा दिनेश (भारत) - १.३० कोटी
शबनीम इस्माइल (दक्षिण आफ्रिका) - १ कोटी २० लाख 
फोबी लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया) - १ कोटी 

Web Title: women's premier league schedule BCCI Secretary Jai Shah said that there are several options for the venue of wpl 2024 which include Maharashtra, Gujarat, Bangalore and Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.