सिडनी : लॉरा वॉलवार्ट हिने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला १७ धावांनी पराभूत केलं. या महत्त्वपूर्ण विजयासह दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत सहा बाद १३६ धावा केल्या. वॉलवार्टने नाबाद ५३ धावा केल्या. शेवटच्या आठ चेंडूंत तिने चार चौकार फटकावले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेने सलग तीन विजय मिळवत अंतिम चार संघात प्रवेश केला.
द. आफ्रिकेच्या लिजेली लीला (४) चांगली कामगिरी करता आली नाही. डायना बेगने तिला बाद केले. डेन वॉन निकर्कही (०३) अपयशी ठरली. त्यानंतर मरिजाने काप (३१) व मिगोन डू प्रीज (१७) यांनी डावाला आकार दिला. कर्णधार जावेरिया खानने (३१), अलिया रियाजने (३९) आणि जावेद इराम (१७) यांनी पाककडून अपयशी झुंज दिली.
अन्य सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला ४६ धावांनी नमवत उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ५ बाद १४३ धावा उभारल्यानंतर विंडीजला ९७ धावांत गुंडाळले. (वृत्तसंस्था)
Web Title: Women's T-World Cup: The. Africa in the semifinals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.