मुंबई : येथे सुरु असलेल्या तिरंगी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी आॅस्टेÑलिया आणि इंग्लंड या तुल्यबळ संघांमध्ये जेतेपदाची रोमांचक लढत रंगेल. आपल्या दमदार खेळाने दिमाखात अंतिम फेरी गाठलेल्या आॅस्टेÑलियन महिलांना संभाव्य विजेते मानले जात असले, तरी त्यांना नमविण्याची क्षमता राखून असलेला इंग्लंड संघही आपला सर्वोत्तम खेळ करण्याच्या निर्धाराने त्वेषाने खेळेल. दरम्यान, मालिकेत सलग तीन सामने गमावल्यानंतर यजमान भारतीय महिलांचे आव्हान झटपट संपुष्टात आले.संपूर्ण मालिका एकाच मैदानावर खेळवली गेल्याने दोन्ही संघांना ब्रेबॉर्न स्टेडियमवरील परिस्थितीची चांगली माहिती झाली आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात आॅस्टेÑलियाला सहज नमविले असले, तरी मागील दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले असल्याने, अंतिम फेरीत आॅसी संघाला नमविणे त्यांच्यासाठी काहीसे आव्हानात्मक ठरेल.इंग्लंडच्या फलंदाजीची मुख्य मदार डॅनियली वॅटवर असेल. नताली स्किव्हर, टैमी ब्यूमोंट व कर्णधार हीथर नाइट यांच्याकडूनही संघाला मोठी अपेक्षा असेल. आॅसीची फिरकीपटू जेस जोनासनविरुद्ध इंग्लंडला सावध रहावे लागेल. तसेच, कॅटी जॉर्ज, टॅश फरांट व जेनी गुन यांना आॅस्टेÑलियाला मर्यादित धावांमध्ये रोखावे लागेल.दुसरीकडे बेथ मूनी, एलिसा हिली, कर्णधार मेग लेनिंग, एलिसे विलानी व एलिसे पेरी हे आॅसीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. या सर्वांची बॅट अंतिम सामन्यात तळपल्यास इंग्लंड अडचणीत येईल. तसेच मेगन शूट, डेलिसा किमिन्स यांच्यासह अॅश्ले गार्डनर - जोनासन ही फिरकी जोडीही आॅस्टेÑलियासाठी निर्णायक ठरेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महिला टी२०; आॅस्ट्रेलिया - इंग्लंड आज जेतेपदासाठी भिडणार
महिला टी२०; आॅस्ट्रेलिया - इंग्लंड आज जेतेपदासाठी भिडणार
येथे सुरु असलेल्या तिरंगी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी आॅस्टेÑलिया आणि इंग्लंड या तुल्यबळ संघांमध्ये जेतेपदाची रोमांचक लढत रंगेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:59 AM