सेंच्युरियन : भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२0 सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत मालिका न गमावता मायदेशी परतणार आहे. भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे मालिकेतील अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा बनला असून भारताने बाजी मारल्यास मालिका जिंकण्यात त्यांना यश येईल. त्याचवेळी यजमानांना मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य असेल.
द. आफ्रिकाने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना १५.३ षटकांत ३ बाद १३0 धावा केल्या होत्या. त्याच वेळेस पावसाचे आगमन झाल्याने हा सामना रोखावा लागला. जवळपास २ तासांच्या प्रतीक्षेनंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाचवा आणि अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२0 क्रिकेट सामना २४ फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे खेळवला जाईल.
केपटाऊनमध्ये विजय मिळवल्यास भारत द. आफ्रिकेच्या एकाच दौºयात दोन मालिका जिंकणारा पहिला संघ बनेल. याआधी भारताने आॅस्ट्रेलियातही टी-२0 मालिका जिंकली होती. बुधवारी सकाळी पाऊस थांबल्यामुळे सामना सुरू होण्याची आशा उंचावली होती; परंतु पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने हा सामना अखेर रद्द झाला.
दक्षिण आफ्रिकेकडून १५.३ षटकांच्या डावादरम्यान सलामीवीर लिजेल ली (नाबाद ५८) आणि
डेन वॉन नीकर्क (५५) यांनी
अर्धशतके ठोकली. भारताकडून आॅफस्पिनर दीप्ती शर्माने ३३
धावांत २ गडी बाद केले. लेगस्पिनर पूनम यादवने १ गडी बाद
केला. आजचा चौथा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ टी-२0 मालिका गमावणार नाही हे निश्चित झाले आहे. याआधी भारतीय
संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती.
दक्षिण आफ्रिका : १५.३ षटकांत ३ बाद १३0. (डी. वॉन निएकर्क ५५, लिजले ली नाबाद ५८. दीप्ती शर्मा २/३३, पूनम यादव १/२३).
Web Title: Women's T20; India - The Africa cancels the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.