smriti mandhana । नवी दिल्ली : ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाला आजपासून सुरूवात होत आहे. यंदाचा महिला ट्वेंटी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवला जात आहे. भारतीय महिला संघ आगामी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच भारताच्या अंडर-19 महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होईल. मात्र, या स्पर्धेच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे.
मानधनाच्या दुखापतीने वाढवली डोकेदुखी दरम्यान, या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. मराठमोळ्या स्मृती मानधनाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्याच्यावेळी बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. "सराव सामन्यादरम्यान स्मृती मानधनाच्या बोटाला दुखापत झाली. मात्र, ती विश्वचषकातून बाहेर झाली की नाही हे अद्याप निश्चित नाही. पण ती पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पीटीआयने आयसीसीच्या एका सूत्राच्या हवाल्याने दिली.
ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मानधना (उप कर्णधार), यस्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, देविका वैद्य, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा आणि राधा यादव.
विश्वचषकासाठी दोन गट खालीलप्रमाणे -
- गट 1 - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश.
- गट 2 - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड.
स्पर्धेचे वेळापत्रक -
- 10 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - केपटाऊन
- 11 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड - पार्ल
- 11 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - पार्ल
- 12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन
- 12 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - केपटाऊन
- 13 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड - पार्ल
- 13 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड - पार्ल
- 14 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - गेबेरा
- 15 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - केपटाऊन
- 15 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड - केपटाऊन
- 16 फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया - गेबेरा
- 17 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - केपटाऊन
- 17 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड - केपटाऊन
- 18 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध भारत - गेबेरा
- 18 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया - गेबेरा
- 19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज - पारल
- 19 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - पारल
- 20 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध भारत - गेबेरा
- 21 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन
- 21 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - केपटाऊन
नॉकआउट सामने -
- 23 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 1 - केपटाऊन
- 24 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 2 - केपटाऊन
- 26 फेब्रुवारी - अंतिम सामना - केपटाऊनX
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"