T20 World Cup 2024 : 'त्या' व्यक्तींना विश्वचषकात मोफत प्रवेश; तीन तारखेपासून रंगणार थरार

t20 world cup ticket price 2024 : तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:54 PM2024-09-26T14:54:41+5:302024-09-26T14:54:58+5:30

whatsapp join usJoin us
women's t20 world cup 2024 free entry for under 18 world cup   | T20 World Cup 2024 : 'त्या' व्यक्तींना विश्वचषकात मोफत प्रवेश; तीन तारखेपासून रंगणार थरार

T20 World Cup 2024 : 'त्या' व्यक्तींना विश्वचषकात मोफत प्रवेश; तीन तारखेपासून रंगणार थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

t20 world cup schedule : येत्या तीन ऑक्टोबरपासून दुबईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघ या स्पर्धेसाठी यूएईत दाखल झाला आहे. महिला ट्वेंटी-२० विश्वचषकात १८ वर्षांखालील व्यक्तींना मोफत प्रवेश असेल. विश्वचषकाची तिकीट विक्री बुधवारी सुरू झाली. सर्वांत कमी किमतीचे तिकीट ५ दिरहमचे (जवळपास ११४ रुपये) आहे. विश्वचषक आधी बांगलादेशात होणार होता. राजकीय अस्थिरतेमुळे ही स्पर्धा यूएईत हलविण्यात आली. 

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रेक्षकसंख्या लक्षात घेत तिकीटदर ठरविण्यात आले आहे. महिला विश्वचषकात चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दहा देशांचा समावेश आहे. सलामीचा सामना ३ ऑक्टोबर तर अंतिम सामना २० ऑक्टोबरला होईल.

दरम्यान, BCCI ने जाहीर केलेल्या भारताच्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अलीकडेच ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले. ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले. २० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

विश्वचषकासाठी भारताचा संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव. 

Web Title: women's t20 world cup 2024 free entry for under 18 world cup  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.