महिला क्रिकेट विश्वचषक कुठे होणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. बीसीसीआयने यजमानपद घेण्यास नकार दर्शवल्याने श्रीलंका किंवा यूएईत ही स्पर्धा होईल असे बोलले जात होते. नियोजित वेळापत्रकानुसार बांगलादेशात ही स्पर्धा होणार होती. मात्र, तेथील वातावरण, हिंसेची आग आणि जाळपोळीच्या घटनांमुळे बांगलादेशात स्पर्धा होणे शक्य नाही. त्यामुळे आयसीसी इतर देशात स्पर्धा भरवण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेल्या हिंसाचारामुळे महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे आयोजन धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ही स्पर्धा इतरत्र हलवण्याचा विचार करत आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीचा निर्णय झाला असून, यूएईच्या धरतीवर विश्वचषकाची स्पर्धा खेळवली जाईल. खरे तर बांगलादेशमध्ये जून महिन्यापासून हिंसाचार सुरू झाला होता आणि त्यानंतर ही आग संपूर्ण देशभरात पसरली. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आणि हजारो लोक जखमी झाले. भारतात विश्वचषकाची स्पर्धा होईल अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयने याला नकार दर्शवला. त्यामुळे यूएईत स्पर्धेचा थरार रंगण्याची शक्यता होती ज्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते.
यूएईत रंगणार थरार
दरम्यान, महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल, असे नियोजित आहे. पण, स्पर्धा यूएईत होणार असल्याने नवीन वेळापत्रक समोर येईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया