womens T20 world cup : भारतीय महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, ती दुर्दैवीरित्या धावबाद झाली. यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैन ( Nasser Hussain) याने तिला शाळकरी मुलींसारखी चूक असे म्हटले... त्यावर सामन्यानंतर हरमनप्रीतने उत्तर दिलेय
हरमनप्रीत कौर मॅच पोस्ट प्रेझेंटेशनला चष्मा घालून का पोहोचली? कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. संघातर्फे बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. तिने 37 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार मेग लॅनिंग 34 चेंडूत 49 धावांवर नाबाद राहिली. तिने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर अॅशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने 32 धावांत 2 बळी घेतले. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ३ फलंदाज झटपट माघारी परतल्या. जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी उत्कृष्ट भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.
जेमिमाने 43 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या षटकात दीप्ती शर्माने वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि भारतीय संघ 8 विकेट गमावून 167 धावाच करू शकला. सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली,''त्यांनी असं म्हटलं? मला माहीत नाही. तो त्यांचा विचार आहे. पण, काहीतरी घडले. क्रिकेटमध्ये फलंदाजासोबत असं अनेकदा घडताना मी पाहिले आहे. त्यांची बॅट कुठेतरी अडकली आहे. आज माझ्यासाठी तो दुर्दैवी दिवस होता.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"