मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर ब-याच आधी रवाना होत आहे. त्यामुळे खेळाडूंना तेथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय कर्णधार मिताली राजने आज सांगितले.भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौºयात तीन वन-डे व पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. वन-डे मालिकेला ५ फेब्रुवारीपासून किम्बरले येथे सुरुवात होणार आहे तर टी-२० मालिका १३ फेब्रुवारीपासून खेळली जाईल. भारतीय संघ आज, बुधवारी दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ बºयाच दिवसांआधी रवाना होण्याचा लाभ मिळेल का, याबाबत बोलताना मिताली म्हणाली,‘आम्ही गेल्या वर्षी विश्वकप स्पर्धेला बराच कालावधी शिल्लक असताना इंग्लंडला गेलो होतो. त्यामुळे तेथील वातावरणासोबत जुळवून घेण्यास मदत झाली. प्रशिक्षक तुषार अरोठे यांनीही कर्णधाराच्या सुरात सूर मिसळला. अरोठे म्हणाले, ‘आमच्यासाठी परिस्थितीसोबत जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही पहिल्या वन-डे पूर्वी दोन सराव सामने खेळणार आहोत. आम्ही विश्वकप स्पर्धेसाठीही १० दिवसांपूर्वी गेलो होते.
मी युवा खेळाडूंना नव्याने सुरुवात करणार असल्याचा सल्ला देत आहे. हा महत्त्वाचा दौरा असून खडतर आहे. आम्ही यापूर्वीही द. आफ्रिकेत खेळलो आहोत. त्यांनी विश्वकप स्पर्धेत जवळजवळअंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे या मालिकेत प्रत्येक खेळाडूच्या कौशल्याची कसूनचाचणी होणार आहे. - मिताली राज