कॅनबरा : एलिसी हिली आणि बेथ मुनी यांनी दिलेल्या विक्रमी सलामीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गुरुवारी महिला टी२० विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात येथे बांगलादेशचा ८६ धावांनी धुव्वा उडवला. यष्टिरक्षक फलंदाज हिलीने ५३ चेंडूंत ८३ आणि मुनीने ५८ चेंडूंत नाबाद ८१ धावा केल्या. या दोघांशिवाय एशलीग गार्डनरने ९ चेंडूंत नाबाद २२ धावांची खेळी केली.
फलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १ बाद १८९ अशी विशाल धावसंख्या रचली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ९ बाद १०३ धावाच करू शकला. त्यांच्याकडून फरगाना हकने सर्वाधिक ३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगान शटने (४/२१) व जेस जोनासनने (२/१७) यांनी अचूक मारा केला. ऑस्ट्रेलियाचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय असून त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
हिली व मुनी यांनी १७ षटकांत १५१ धावांची जबरदस्त सलामी देत आॅसीच्या विजयाचा पाया रचला. आॅस्ट्रेलियाकडून कोणत्याही बळीसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. हिलीने तिच्या खेळीत १० चौकार व ३ षटकार मारले, तर मुनी हिने ९ चौकार मारले. (वृत्तसंस्था)
Web Title: Womens Twenty20 World Cup Australia beat Bangladesh by 86 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.