नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकाच गटात आले असून 12 फेब्रुवारीला आमनेसामने असणार आहेत. 2023 मधील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या ट्रान्स-टास्मानियन प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. तर ग्रुप ए मध्ये बांगलादेशचा देखील समावेश आहे, ज्यांनी अलीकडेच टी-20 विश्वचषकाची पात्रता फेरी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर या विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
ग्रुप ए मधील संघ - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश. ग्रुप बी मधील संघ - इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड.
भारतीय संघाचे विश्वचषकातील सामने 12 फेब्रुवारी विरूद्ध पाकिस्तान 15 फेब्रुवारी विरूद्ध वेस्ट इंडिज 18 फेब्रुवारी विरूद्ध इंग्लंड 20 फेब्रुवारी विरूद्ध आयर्लंड
10 फेब्रुवारीपासून रंगणार थरार
10 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, केपटाऊन
11 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, पार्ल
11 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, पार्ल
12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, केपटाऊन
12 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, केपटाऊन
13 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, पार्ल
13 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, पार्ल
14 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेशस, Gqeberha
15 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, केपटाऊन
15 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, केपटाऊन
16 फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, Gqeberha
17 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, केपटाऊन
17 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, केपटाऊन
18 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध भारत, Gqeberha
18 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, Gqeberha
19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, पार्ल
19 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, पार्ल
20 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध भारत, Gqeberha
21 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, केपटाऊन
21 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, केपटाऊन
23 फेब्रुवारी - उपांत्यफेरी 1 - केपटाऊन
24 फेब्रुवारी - राखीव दिवस - केपटाऊन
24 फेब्रुवारी - उपांत्यफेरी 2 - केप टाऊन
25 फेब्रुवारी - राखीव दिवस - केपटाऊन
26 फेब्रुवारी - फायनल - केपटाऊन
27 फेब्रुवारी - राखीव दिवस - केपटाऊन