नागपूर :
आपल्या जिवलग मित्रावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू उमेश यादवला चांगलेच महागात पडले आहे. मित्राने पॉवर ऑफ अॅटर्नीचा उपयोग करून, उमेशऐवजी स्वत:च्याच नावाने ४४ लाखांची प्रॉपर्टी खरेदी केली. तब्बल सात वर्षांनंतर उमेशने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शैलेश ठाकरे (३७) असे आरोपीचे नाव आहे. उमेश व शैलेशची २००७ साली ओळख झाली. उमेशला तो आयकर व इतर प्रशासकीय कामांसाठी मदत करायचा. २०१३ पासून उमेशने शैलेशला व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले व त्याला दर महिन्याला ५० हजार रुपये वेतन देत होता.
काय आहे प्रकरण?
■ २०१४ साली शहरातील एक प्रॉपर्टी ४४ लाखांमध्ये खरेदी करण्याचे ठरले. उमेशच्या वतीने शैलेश हा व्यवहार पाहणार होता.
■ उमेशने शैलेशच्या खात्यात ४४ लाख रुपये पाठविले, परंतु शैलेशने उमेशऐवजी स्वतःच्याच नावावर मालमत्ता खरेदी केली.
जून, २०१५ मध्ये उमेशने मालमत्ता खरेदी कधी करायचे, असे विचारले असता, ती मालमत्ता मी स्वतः घेतल्याचे शैलेशने सांगितले. उमेशला धक्का बसला.
■ अखेरीस उमेशने कोराडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरु आहे.
Web Title: Worked as a friend and he cheated 44 lakhs Fraud of cricketer Umesh Yadav in land purchase
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.