गुवाहाटी - नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा रद्द करावी लागली होती. मात्र यावेळी काही बदलांसह ही स्पर्धात होत आहे.दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या लढतीमधून यश धुलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत तामिळनाडूच्या गोलांदाजंची धुलाई केली. त्याने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याबरोबरच यश धुलने रणजी करंडक स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरसह काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अखेरीस ११३ धावा काढून यश बाद झाला.
𝙒𝙝𝙖𝙩 𝘼 𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩! 👌 👌
💯 on Ranji Trophy debut! 👏 👏
This has been a fantastic batting performance from Yash Dhull in his maiden First Class game. 👍 👍 @Paytm | #RanjiTrophy | #DELvTN | @YashDhull2002
Follow the match ▶️ https://t.co/ZIohzqOWKipic.twitter.com/uaukVSHgUq— BCCI Domestic (@BCCId… तामिळनाडूविरुद्धच्या लढतीत यश धुल हा ९७ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. त्यान पूल केलेला एक चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. मात्र रिप्लेमध्ये चेंडू नोबॉल असल्याचे दिसले आणि यशला जीवदान मिळाले.
या सामन्यात दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली होती. ध्रुव शोरी (१) आणि हिंमत सिंह (०) पहिल्या तीन षटकांमध्येच माघारी परतले होते. त्यानंतर यश धुल आणि नितीश राणा यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवत दिल्लीचा डाव सावरला. दरम्यान, रणजी करंडक स्पर्धेतील अन्य एका सामन्यातून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राज बावा यानेही दमदार सुरुवात केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली.