Sachin Tendulkar, women's U19 World Champions । अहमदाबाद : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे महिला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिले विश्वविजेतेपद ठरले. वरिष्ठ स्तरावर भारतीय संघाला तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी पहिला विश्वचषक पटकावून दिला. विश्वविजेत्या टीम इंडियातील खेळाडूंचा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दरम्यान, आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयच्या नियोजनानुसार भारताच्या अंडर-19 मुलींचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पार पडला. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, खजिनदरा आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. या सामन्यासाठी विश्वविजेत्या 15 महिला खेळाडूंची उपस्थिती होती.
सचिन तेंडुलकरने आपल्या भाषणाची सुरूवात गुजरातीत केली आणि भारतीय मुलींचे अभिंदन केले. तसेच महिला प्रीमियर लीग जागतिक क्रिकेटमध्ये मोठी स्पर्धा होणार असल्याचे त्याने म्हटले. अंडर-19 संघाची कर्णधार शेफाली वर्माला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी 5 कोटी रूपयांच्या रोख रकमेचे बक्षीस दिले.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1620780823963402240?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1620780823963402240%7Ctwgr%5E1744ff047d48a1ec167d702322fb5a1bf818cd22%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Fquery%3Dhttps3A2F2Ftwitter.com2FCricCrazyJohns2Fstatus2F1620780823963402240widget%3DTweet
जय शाह यांनी केली होती घोषणाBCCIचे सचिव जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत बोलताना म्हटले होते, "मला अतिशय आनंद होत आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि BCCIचे अधिकारी 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता भारताच्या विश्वविजेत्या U19 महिला संघाचा सत्कार करतील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांचा सन्मान केला जाईल." याआधी आणखी एका ट्विटमध्ये जय शाहांनी विश्वविजेत्यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 साठी आमंत्रित केले होते.
विश्वविजेच्या संघाचे शिलेदार -
- शेफाली वर्मा (कर्णधार)
- शब्बम एमडी
- सोनिया मेधिया
- हर्ले गाला
- फलक नाज
- पार्श्वरी चोप्रा
- अर्चना देवी
- मन्नत कश्यप
- सोनम यादव
- श्वेता सेहरावत
- सौम्या तिवारी
- हृषिता बासू
- त्रिशा रेड्डी
- रिचा घोष
- तितास साधू
अंडर-19 विश्वचषकात भारतीय खेळाडूंचा बोलबालास्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -
- श्वेता सेहरावत (भारत) - 297 धावा
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 293 धावा
- शेफाली वर्मा (भारत) - 172 धावा
- इमान फातिमा (पाकिस्तान) - 157 धावा
- जॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड) - 155 धावा
सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू -
- मॅगी क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - 12 बळी
- पार्श्वरी चोप्रा (भारत) - 11 बळी
- हॅना बेकर (इंग्लंड) - 10 बळी
- अनोसा नासिर (पाकिस्तान) - 10 बळी
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 9 बळी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"