World Championship Of Legends 2024 IND vs PAK : World Championship of Legends 2024 मध्ये पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. या बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. पाकिस्तान चॅम्पियन्स संघाने ६८ धावांनी मोठा विजय साकारला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार अजय देवगण उपस्थित होता. अजय देवगणने सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची भेट घेतली. हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली 'इंडिया चॅम्पियन्स' ही स्पर्धा खेळत आहे. यामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैनाचाही समावेश आहे. (World Championship of Legends 2024)
India Champions vs Pakistan Champions ही लढत बर्मिंगहॅम येथे झाली. भारतीय संघाला पाकिस्तानविरूद्ध ६८ धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले होते. पण, विजयाची हॅटट्रिक लगावण्यात भारताच्या शिलेदारांना अपयश आले. इंडिया चॅम्पियन्स संघाने इंग्लंड चॅम्पियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. तर वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्ध २७ धावांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने स्फोटक खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २४३ धावा करून भारताची डोकेदुखी वाढवली. पाकिस्तानकडून यष्टीरक्षक कामरान अकमलने ४० चेंडूत ७७ धावा केल्या. तर शरीजल खानने ७२ धावांची अप्रतिम खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १७५ धावा करू शकला अन् ६८ धावांनी सामना गमावला. भारताकडून सुरेश रैनाने ५२ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर युवराज सिंग १४ धावा करून तंबूत परतला. या स्पर्धेत भारताचा पुढील सामना ८ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघासोबत होणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स विरूद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स अशी लढत होईल.
Web Title: World Championship Of Legends 2024 India Champions vs Pakistan Champions Pakistan defeated India by 68 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.