Join us  

वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले

अलीकडेच हरभजन सिंग आणि कामरान अकमल यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 3:19 PM

Open in App

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेदरम्यान हरभजन सिंग आणि कामरान अकमल यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. अखेर अकमलने माघार घेत माफी मागितली होती. पण, आता इंग्लंडच्या धरतीवर होत असलेल्या लीजेंड्स चॅम्पियन्स लीगदरम्यान हे खेळाडू आमनेसामने आले. शनिवारी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना झाला, ज्यात पाकिस्तानच्या संघाने ६८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर अकमल आणि भज्जी एकत्र चर्चा करताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

खरे तर विश्वचषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यादरम्यान अकमलने अर्शदीप सिंगचा दाखला देत शीख समुदायाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. अकमलच्या या विधानाची खबर लागताच हरभजनने संतप्त प्रतिक्रिया दिली. मग कामरान अकमलने हरभजनसह शीख समुदायाची माफी मागितली. मग हरभजनने पुन्हा एकदा अकमलवर बोचरी टीका केली होती.  

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या सामन्यातील शेवटचे षटक अर्शदीप सिंग टाकत होता. यावेळी सामन्याचे विश्लेषण करताना कामरान अकमलची जीभ घसरली. शेवटच्या षटकात अर्शदीपला १८ धावांचा बचाव करायचा होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल सामन्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेत बोलत असताना अर्शदीपबद्दल त्याने भाष्य केले. अर्शदीप सिंग २० वे षटक टाकत आहे. तो या षटकात भरपूर धावाही देऊ शकतो, असे कामरान अकमल म्हणाला. इतकेच नव्हे तर अर्शदीपबद्दल बोलताना त्याने शिख धर्माचा अपमानही केला. त्यावरून हरभजनने अकमलला प्रत्युत्तर दिले. वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच अकमलने माफी मागितली.

हरभजनची संतप्त प्रतिक्रियाकामरान अकमलला सुनावताना भज्जी म्हणाला होता की, कामरान अकमलचे हे एक अतिशय मूर्खपणाचे विधान आणि अतिशय बालिश कृत्य आहे जे केवळ 'नालायक' व्यक्ती करू शकते. कामरान अकमलने समजून घेतले पाहिजे तो नक्की काय बोलला आहे. कोणाच्याही धर्माबद्दल काहीही बोलण्याची आणि त्याची खिल्ली उडवण्याची गरज नाही, मी कामरान अकमलला विचारू इच्छितो की तुम्हाला शिखांचा इतिहास माहित आहे का? शीख तेच आहेत ज्यांनी तुमच्या समाजाला, तुमच्या माता-बहिणींना वाचवण्यासाठी सर्वकाही केले. हे तुमच्या पूर्वजांना विचारा. १२ वाजता वाजता शिखांनी मुघलांवर हल्ला केला आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवले. म्हणूनच त्याने (अकमल) लवकर माफी मागितली ही एक चांगली बाब आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. मग तो हिंदू, इस्लाम, शीख किंवा ख्रिश्चन कोणताही धर्म असो. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानहरभजन सिंगऑफ द फिल्ड