नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं अनेकदा धोनीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच माझ्या नेतृत्वातील संघात धोनीसारखा खेळाडू असल्याचा मला अभिमान असल्याचा उल्लेखही बऱ्याचदा कोहलीनं केला. आता विराट कोहलीच्या या मताला धोनीच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांनीही दुजोरा दिला आहे. धोनीच्या लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी तरुणांनी भरलेल्या भारतीय संघासाठी धोनीच परफेक्ट मेंटर असल्याचं म्हटलं आहे.
एमएस धोनी क्रिकेट अकादमी क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी धोनीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी बोलत होते. ते म्हणाले, धोनीच्या चतुराईची शैली वाखाणण्याजोगी आहे. धोनी ज्या पद्धतीनं रणनीती तयार करतो, ऐनवेळी क्षेत्ररक्षणात तो करत असलेले बदल यामुळे कोहलीसाठी परफेक्ट गाइड आहे. सामन्याचा अभ्यास करणं आणि तशी रणनीती आखण्यात धोनीला तोड नाही. असं विराट कोहलीसुद्धा करू शकत नाही. जर धोनी टीम इंडियात खेळत नसता तर विराट कोहलीला कोणीही गाइड मिळाला नसता. विराट कोहलीला थोडा वेळ देण्याची गरज आहे.
केशव म्हणाले, भारतीय क्रिकेटपटूंच्या फलंदाजीत धोनीचं स्थान विशेष आहे. मला वाटतं, धोनीला नंबर चारवर खेळवण्यासाठी उतरवलं पाहिजे. त्यामुळे धोनीला चार नंबरवर खेळवलं पाहिजे. जेव्हा तो नंबर चारवर फलंदाजी करतो, त्यावेळी खेळण्यासाठी त्याला वेळ मिळतो. धोनीला खेळण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. 5 किंवा 6 नंबरवर फलंदाजी करताना त्याला वेळ मिळत नाही. बऱ्याचदा मोठे फटके मारण्याच्या नादात तो बाद होतो. त्यामुळे धोनीला नंबर चारवर खेळवलं पाहिजे. ऋषभ पंतला टीम इंडियात जागा मिळायला हवी. केशव यांच्या मते, लगेच ऋषभला संघात जागा देणं ही घाई होईल, परंतु कालांतरानं त्याला संघात घ्यायला हवं.
Web Title: world cup 2019 virat kohli dont have match reading skill which ms dhoni have says his childhood coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.