WorldCup 2023: भारतीयांसाठी क्रिकेट अतिशय प्रिय आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकाला आता काही दिवस उरले आहेत. लवकरच जगातील 10 सर्वोत्तम क्रिकेट संघ भारतीय मैदानावर चषकासाठी एकमेकांना भिडतील. दरम्यान, विश्वयषकापूर्वी अनेक दिग्गजांनीही आपापल्या आवडीचे संघ निवडण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्टनेही 2023 च्या विश्वचषकासाठी टॉप चार संघांची निवड केली आहे. तसेच, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि युवराज सिंगसारख्या मोठ्या खेळाडूबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
'हे असतील टॉप चार संघ'ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ज्या चार संघांचे नाव घेतले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त गिलख्रिस्टने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा आपल्या पहिल्या चार यादीत ठेवले आहे. ते म्हणाले की, भारताने आशिया चषक 2023 मध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. उर्वरित संघांना भारताकडून कडवे आव्हान असणार आहे.
‘धोनी, सचिनने टीम इंडियासोबत वेळ घालवावा’स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत गिलख्रिस्टने टीम इंडियासाठी एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांची गरज असल्याचे म्हटले आहे. धोनी आणि सचिनने टीम इंडियासोबत वेळ घालवावा आणि अनुभव त्यांच्यासोबत शेअर करावेत. भारतीय खेळाडूंना काय हवे, हे मी सांगू शकत नाही. पण मी भारतीय व्यवस्थापनात असतो, तर निश्चितपणे धोनी आणि सचिनला खेळाडूंसोबत वेळ घालवायला सांगितले असते. युवराज सिंगलाही संघासोबत राहायला सांगितले असते. युवराज 2011 च्या विश्वचषकाचा हिरो आहे, अशी प्रतिक्रिया गिलख्रिस्टने दिली.