Join us  

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर; वन-डे वर्ल्ड कप २०२३चे व्हेन्यू ठरले

World Cup 2023 Schedule: इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 9:37 AM

Open in App

World Cup 2023 Schedule: आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ (World Cup 2023) भारतात होणार आहे. तो यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळला जाऊ शकतो. याचदरम्यान विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो, अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे देशातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानूसार, सध्या सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्ताने बहुतेक सामने चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे खेळवले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, बांगलादेश देखील त्यांचे बहुतेक सामने कोलकाता आणि गुवाहाटी येथे खेळू शकेल कारण यामुळे शेजारील देशाच्या चाहत्यांसाठी प्रवासाचे अंतर कमी होईल.

सूत्रांनी सांगितले की, भारतीय संघाने बीसीसीआयला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पिनर्सना मदत करणार्‍या मैदानात सामने खेळवण्याची विनंती केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा सामना आयोजित केला जाण्याची दाट शक्यता आहे, तर न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने खेळपट्ट्या संथ असलेल्या इतर स्टेडियममध्ये खेळवले जातील.

बीसीसीआयने ५० षटकांच्या विश्वचषकापूर्वी देशभरातील स्टेडियम्सचे अपग्रेडेशन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक निधी राखून ठेवला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वी सांगितले होते की, स्टेडियमच्या दुरवस्थेवर अलीकडे झालेल्या टीकेनंतर बोर्ड स्वच्छ शौचालये, सुलभ प्रवेश आणि स्वच्छ आसनांसह पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणार आहे. देशातील सर्व विद्यमान पायाभूत सुविधा विश्वचषकापूर्वी अपग्रेड केल्या जातील. स्टेडियमचे मूल्यांकन आयपीएल आणि विश्वचषकादरम्यान मोठ्या संख्येने चाहत्यांना जोडण्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत पायाभूत सुविधांचे अपग्रेडिंग केले जाईल, असं शाह यांनी सांगितले.

महत्वाचे मुद्दे:

  • भारत आणि पाकिस्तान- अहमदाबाद
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया- चेन्नई
  • आयपीएलनंतर विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होणार
  • १४ ठिकाणी होणार सामन्यांचे आयोजन
  • पाकिस्तानचे अधिक सामने बंगळुरु आणि चेन्नईत होणार
  • बांग्लादेशचे अधिक सामने कोलकात आणि गुवाहाटीत होणार
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयआयसीसीनरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App