Join us  

World Cup: बीसीसीआयचे ५०० कोटींचे वाढीव बजेट; दहा स्टेडियमचा कायापालट

BCCI: भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला आता ९६ दिवसांचा कालावधी राहिला आहे. भारतीय संघासह सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 11:11 AM

Open in App

नवी दिल्ली :  भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला आता ९६ दिवसांचा कालावधी राहिला आहे. भारतीय संघासह सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. भारत  पहिल्यांदाच स्वबळावर मोठ्या आयसीसी इव्हेंटचे आयोजन केले असून, आयोजनात कुठलीही कसर शिल्लक ठेवायची नाही, या निर्धारासह  कंबर कसली आहे.

विश्वचषकाचे सामने हे १० स्टेडियमवर होणार आहेत. या दहा स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी बीसीसीआयने ५०० कोटी अतिरिक्त बाजूला काढून ठेवले. अहमदाबाद, चेन्नई, मुंबई, धर्मशाला, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि कोलकाता येथे सामन्यांचे आयोजन केले आहे, तर गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथे सराव सामने होतील.

सर्व स्टेडियमच्या गरजा पाहून ते अद्ययावत करण्याची योजना आखण्यात आली. एलईडी लाइट्स, आसन व्यवस्था तसेच डागडुजीवर प्रत्येक स्टेडियमला प्रत्येकी ५० कोटी रुपये मिळणार आहेत.

चेन्नईमध्ये नवीन खेळपट्टीचेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये लाल मातीच्या दोन खेळपट्ट्या तयार करण्यात येणार आहेत. आयपीएलदरम्यान खेळपट्टीवर खूप टीका झाली होती. स्टेडियमवर नवीन फ्लडलाइट्सदेखील लावल्या जाणार असून बाथरूमपासून स्टँडपर्यंतच्या साफसफाईवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

वानखेडेची आउटफिल्ड सुधारणारमुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आउटफिल्डवर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे ही आउटफिल्डदेखील बदलण्यात येणार आहे. मैदानातील एलईडी लाइट्स आणि कॉर्पोरेट बॉक्सदेखील अपग्रेड करण्यात येईल. याचबरोबर छत नसलेल्या स्टेडियमवरदेखील छत बसवण्यात येणार आहे. पार्किंग स्पेस वाढवण्यात येईल, तसेच आसन व्यवस्थादेखील बदलण्यात येईल. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबीसीसीआय
Open in App