क्रिकेट चाहत्यांनो तयार रहा! विश्वचषकाचे तिकीट बुकिंग १५ ऑगस्टपासून

ई तिकीट राहणार नसल्याने चाहत्यांना काउंटरवरूनच तिकीटे मिळतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:52 AM2023-08-10T05:52:48+5:302023-08-10T05:53:48+5:30

whatsapp join usJoin us
world cup 2023 cricket schedule Cricket fans get ready! World Cup ticket booking from 15th August | क्रिकेट चाहत्यांनो तयार रहा! विश्वचषकाचे तिकीट बुकिंग १५ ऑगस्टपासून

क्रिकेट चाहत्यांनो तयार रहा! विश्वचषकाचे तिकीट बुकिंग १५ ऑगस्टपासून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : क्रिकेट चाहते एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे तिकीट बुकिंग १५ ऑगस्टपासून करू शकणार आहेत. यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचाही समावेश आहे. ५०० ते १० हजार रुपयेदरम्यान तिकिटांच्या किमती असून, शहरागणिक किमती वेगवेगळ्या असू शकतात.

विश्वचषक २०२३चे तिकीट बूक करण्यापूर्वी चाहत्यांना https://www.cricketworldcup.com/register या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरू होईल.  तिकीट विक्रीबाबतची माहिती आधी या वेबसाइटमार्फत मिळणार आहे. याचा लाभ विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी आपली जागा निश्चित करण्यासाठी होणार आहे. ई तिकीट राहणार नसल्याने चाहत्यांना काउंटरवरूनच तिकीटे मिळतील.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात विश्वचषकाचे सामने आयोजित करणाऱ्या राज्य संघटनांच्या तिकीट विक्री रणनीतीला मान्यता दिली. मात्र, बंगाल क्रिकेट संटानेने इडन गार्डनवरील विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. 

तिकिटांची प्रत्यक्ष विक्री कधी?
२५ ऑगस्ट : भारताचा समावेश नसलेले सराव सामने आणि इतर देशांच्या सामन्यांची तिकिटे.
३० ऑगस्ट : भारताचे गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथील सामने.
३१ ऑगस्ट : भारताचे चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथील सामने.
१ सप्टेंबर : भारताचे धर्मशाला, लखनौ आणि मुंबई येथील सामने.
२ सप्टेंबर : भारताचे बंगळुरू आणि कोलकाता येथील सामने.
३ सप्टेंबर : भारताचे अहमदाबादमधील सामने.
१५ सप्टेंबर : उपांत्य सामने आणि अंतिम सामना.

Web Title: world cup 2023 cricket schedule Cricket fans get ready! World Cup ticket booking from 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.