ICC World Cup 2023 : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला आहे.. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल झाला. क्रिकेट चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आणि ते पाहून कर्णधार बाबर आजमसह सर्व खेळाडू भारावले. आज पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळतोय आणि २ बाद ८० धावांवर असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. बाबर आजम व मोहम्मद रिझवान हे नाबाद आहेत.
२०१६नंतर प्रथमच भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाचे स्वागत तर जंगी झाले, परंतु त्यांच्या जेवणात बिफ नाकारल्याने चाहते नाराज झाले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आलेल्या एकाही संघाला बिफ दिले जाणार नाही. पाकिस्तानला कोंबडी, मटन आणि मासे खायला दिले जाणार आहे. शिवाय त्यांच्या डाएट चार्टमध्ये ग्रील्ड लँब चॉप्स, मटन करी, प्रचंड लोकप्रिय बटर चिकन आणि ग्रील्ड फिश हे पदार्थ आहेत. कार्बोहायड्रेट्ससाठी, टीमने वाफवलेला बासमती तांदूळ, बोलोग्नीज सॉसमधील स्पॅगेटी आणि शाकाहारी पुलावची विनंती केली आहे. प्रसिद्ध हैदराबादी बिर्याणी त्यांच्यासाठी असणार आहे.
पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.