New Zealand vs Sri Lanka, World Cup 2023: दमदार सुरुवात करणारा न्यूझीलंड संघ विश्वचषकात मधल्या टप्प्यात ढेपाळला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीसाठी जोर लावावा लागत आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांना विजय नोंदवावाच लागणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने सुरूवातीला चार पैकी चार सामने जिंकून स्पर्धेची दणक्यात सुरूवात केली होती. पाचव्या लढतीत न्यूझीलंडला भारताविरूद्ध स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांची गाडी रूळावरून काहीशी घसरली. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान असे सलग चार पराभव त्यांच्या पदरी आले. त्यामुळे आता आजचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र या सामन्याआधी त्यांच्यापुढ्यात दुहेरी संकट आ वासून उभे आहे.
१. पावसाने याआधी फेरले न्यूझीलंडच्या नशिबावर पाणी
पाकिस्तानशी असलेली लढत न्यूझीलंडला तुलनेने सोपी वाटत होती. न्यूझीलंडने त्या सामन्यात ४०१ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानने अर्ध्या खेळात २००चा टप्पा गाठला. त्यानंतर पावसाच्या तडाख्यामुळे न्यूझीलंडला DL पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या लढतीवरही पावसाचे सावट असल्याने न्यूझीलंडसाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरली आहे. न्यूझीलंडचे ८ गुण असून, पावसामुळे सामना रद्द झाला तरी न्यूझीलंड बाहेर पडू शकतो. सध्या हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचेही ८-८ गुण आहेत आणि नेट रनरेटमध्ये पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानच्या तुलनेत सरस आहे.
२. न्यूझीलंड दुखापतींनी त्रस्त
कर्णधार केन विल्यमसन, जिम्मी नीशाम, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन हे दुखपातीमुळे काही सामने खेळले नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत चार पराभव पचवावे लागले. राचिन रवींद्रने मोठ्या धावा केल्या आहेत. लंकेविरुद्ध त्याच्याकडून अपेक्षा असतील. इंग्लंडविरुद्ध सलामीला शतक ठोकणारा डीवोन कॉन्वे त्यानंतर चक्क अपयशी ठरला. स्पर्धेबाहेर पडलेला श्रीलंका संघ विजयी निरोप घेण्याच्या निर्धाराने या सामन्यात खेळेल.
Web Title: World Cup 2023 NZ vs SL preview New Zealand could have to face Double trouble as they need to win against Sri Lanka but We want to win against Sri Lanka, but...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.