World Cup 2023 Schedule India vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशिया चषक २०२३ हातातून गेल्याने संताप व्यक्त केला अन् BCCIला धमकी देण्यास सुरूवात केली. आशिया चषक २०२३ मध्ये BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर करताच PCBतडून धमकी वजा इशारा देण्याचे काम सुरू झाले. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहीष्कार टाकण्याचा इशारा दिला, पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेसमोर PCBला नमते घ्यावे लागले.
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ असल्याची चर्चा आहे. त्याला आता PCB ने नकार दिलाय. आधी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा करणारे PCB आता भारतात वर्ल्ड कप खेळण्यास येणार आहेत, परंतु नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास ते तयार नसल्याचे वृत्त Dawn News ने दिले आहे. त्यांनी चेन्नई आणि बंगळुरू येथे पाकिस्तानचे सामने खेळवावेल अशी इच्छा व्यक्त केलीय.
भारत-पाकिस्तान सामना कधी?
गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीचा सामना होणार असल्याचा अंदाज आहे. ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि अंतिम सामनाही याच मैदानावर १८ नोव्हेंबरला खेळवली जाईल. भारताचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ १५ ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी १० संघांमध्ये ४८ सामने होतील. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी मुख्य स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. जून महिन्यात झिम्बाब्वे येथे उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरी होईल. त्यात वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात चुरस होईल.