विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाक लढतीसह फायनल अहमदाबादमध्ये, मुंबई, कोलकाता येथे उपांत्य लढती

World Cup 2023 Schedule Announced: भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने  शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:57 AM2023-06-28T05:57:28+5:302023-06-28T05:57:47+5:30

whatsapp join usJoin us
World Cup 2023 Schedule Announced: Final in Ahmedabad with Indo-Pak match, semi-final in Mumbai, Kolkata | विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाक लढतीसह फायनल अहमदाबादमध्ये, मुंबई, कोलकाता येथे उपांत्य लढती

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाक लढतीसह फायनल अहमदाबादमध्ये, मुंबई, कोलकाता येथे उपांत्य लढती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने  शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

एक लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचे उद्घाटन होईल आणि तेथेच अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळविला जाणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल, तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दोन्ही उपांत्य सामन्यांदरम्यान एक राखीव दिवस असेल. फायनलनंतर २० नोव्हेंबर हादेखील राखीव दिवस राहणार आहे. 

५ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या विश्वचषकात दहा संघांचा समावेश असेल. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे आठ संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगमधून पात्र झाले असून, दोन संघ झिम्बाब्वेत सुरू असलेल्या पात्रता फेरीद्वारे निश्चित होतील. सर्व संघ सुरुवातीला राऊंड रॉबिन पद्धतीने एकमेकांविरुद्ध खेळतील. प्रत्येक संघ ९ सामने खेळेल. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील.
दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना दिवस-रात्री खेळविले जातील.
ईशान्येकडील गुवाहाटीत प्रथमच विश्वचषकाचे सामने होतील. सराव सामन्यांसह मुख्य सामन्यांचे येथे आयोजन होईल.
२९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान गुवाहाटी, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद येथे सराव सामने खेळविले जातील.
भारतात  १९८७, १९९६ आणि २०११ ला वन डे विश्वचषकाचे आयोजन झाले. टीम इंडियाने १२ वर्षांआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात अखेरचा विश्वचषक जिंकला होता.

वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक
५ ऑक्टोबर    इंग्लंड वि. न्यूझीलंड    अहमदाबाद
६ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर १    हैदराबाद
७ ऑक्टोबर    बांगलादेश वि. अफगाणिस्तान    धर्मशाला
७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर २    दिल्ली
८ ऑक्टोबर    भारत वि. ऑस्ट्रेलिया    चेन्नई
९ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर १    हैदराबाद
१० ऑक्टोबर    इंग्लंड वि. बांगलादेश    धर्मशाला
११ ऑक्टोबर    भारत वि. अफगाणिस्तान    दिल्ली
१२ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर २    हैदराबाद
१३ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका    लखनौ
१४ ऑक्टोबर    इंग्लंड वि. अफगाणिस्तान    दिल्ली
१४ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. बांगलादेश    चेन्नई
१५ ऑक्टोबर    भारत वि. पाकिस्तान    अहमदाबाद
१६ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २    लखनौ
१७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर १    धर्मशाला
१८ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान    चेन्नई
१९ ऑक्टोबर    भारत वि. बांगलादेश    पुणे
२० ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान    बंगळुरू
२१ ऑक्टोबर    इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका    मुंबई
२१ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २    लखनौ
२२ ऑक्टोबर    भारत वि. न्यूझीलंड    धर्मशाला
२३ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. अफगाणिस्तान    चेन्नई
२४ ऑक्टोबर    दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश    मुंबई
२५ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १    दिल्ली
२६ ऑक्टोबर    इंग्लंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू
२७ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका    चेन्नई
२८ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. बांगलादेश    कोलकाता
२८ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड    धर्मशाला
२९ ऑक्टोबर    भारत वि. इंग्लंड    लखनौ
३० ऑक्टोबर    अफगाणिस्तान वि. क्वालिफायर २    पुणे
३१ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. बांगलादेश    कोलकाता
१ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका    पुणे
२ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर २    मुंबई
३ नोव्हेंबर    क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान    लखनौ
४ नोव्हेंबर    इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    अहमदाबाद
४ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. पाकिस्तान    बंगळुरू
५ नोव्हेंबर    भारत वि. दक्षिण आफ्रिका    कोलकाता
६ नोव्हेंबर    बांगलादेश वि. क्वालिफायर २    दिल्ली
७ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान    मुंबई
८ नोव्हेंबर    इंग्लंड वि. क्वालिफायर १    पुणे
९ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू
१० नोव्हेंबर    द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान    अहमदाबाद
११ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर १    बंगळुरू
१२ नोव्हेंबर    इंग्लंड वि. पाकिस्तान    कोलकाता
१२ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश    पुणे
१५ नोव्हेंबर    पहिला उपांत्य सामना    मुंबई
१६ नोव्हेंबर    दुसरा उपांत्य सामना    कोलकाता
१७ नोव्हेंबर     राखीव दिवस    —————
१९ नोव्हेंबर    फायनल     अहमदाबाद    
२० नोव्हेंबर     राखीव दिवस    ——————

Web Title: World Cup 2023 Schedule Announced: Final in Ahmedabad with Indo-Pak match, semi-final in Mumbai, Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.