Join us  

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाक लढतीसह फायनल अहमदाबादमध्ये, मुंबई, कोलकाता येथे उपांत्य लढती

World Cup 2023 Schedule Announced: भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने  शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 5:57 AM

Open in App

मुंबई : भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने  शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

एक लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचे उद्घाटन होईल आणि तेथेच अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळविला जाणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल, तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दोन्ही उपांत्य सामन्यांदरम्यान एक राखीव दिवस असेल. फायनलनंतर २० नोव्हेंबर हादेखील राखीव दिवस राहणार आहे. 

५ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या विश्वचषकात दहा संघांचा समावेश असेल. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे आठ संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगमधून पात्र झाले असून, दोन संघ झिम्बाब्वेत सुरू असलेल्या पात्रता फेरीद्वारे निश्चित होतील. सर्व संघ सुरुवातीला राऊंड रॉबिन पद्धतीने एकमेकांविरुद्ध खेळतील. प्रत्येक संघ ९ सामने खेळेल. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील.दोन्ही उपांत्य सामने आणि अंतिम सामना दिवस-रात्री खेळविले जातील.ईशान्येकडील गुवाहाटीत प्रथमच विश्वचषकाचे सामने होतील. सराव सामन्यांसह मुख्य सामन्यांचे येथे आयोजन होईल.२९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान गुवाहाटी, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद येथे सराव सामने खेळविले जातील.भारतात  १९८७, १९९६ आणि २०११ ला वन डे विश्वचषकाचे आयोजन झाले. टीम इंडियाने १२ वर्षांआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात अखेरचा विश्वचषक जिंकला होता.वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक५ ऑक्टोबर    इंग्लंड वि. न्यूझीलंड    अहमदाबाद६ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर १    हैदराबाद७ ऑक्टोबर    बांगलादेश वि. अफगाणिस्तान    धर्मशाला७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर २    दिल्ली८ ऑक्टोबर    भारत वि. ऑस्ट्रेलिया    चेन्नई९ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर १    हैदराबाद१० ऑक्टोबर    इंग्लंड वि. बांगलादेश    धर्मशाला११ ऑक्टोबर    भारत वि. अफगाणिस्तान    दिल्ली१२ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर २    हैदराबाद१३ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका    लखनौ१४ ऑक्टोबर    इंग्लंड वि. अफगाणिस्तान    दिल्ली१४ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. बांगलादेश    चेन्नई१५ ऑक्टोबर    भारत वि. पाकिस्तान    अहमदाबाद१६ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २    लखनौ१७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर १    धर्मशाला१८ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान    चेन्नई१९ ऑक्टोबर    भारत वि. बांगलादेश    पुणे२० ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान    बंगळुरू२१ ऑक्टोबर    इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका    मुंबई२१ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २    लखनौ२२ ऑक्टोबर    भारत वि. न्यूझीलंड    धर्मशाला२३ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. अफगाणिस्तान    चेन्नई२४ ऑक्टोबर    दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश    मुंबई२५ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १    दिल्ली२६ ऑक्टोबर    इंग्लंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू२७ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका    चेन्नई२८ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. बांगलादेश    कोलकाता२८ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड    धर्मशाला२९ ऑक्टोबर    भारत वि. इंग्लंड    लखनौ३० ऑक्टोबर    अफगाणिस्तान वि. क्वालिफायर २    पुणे३१ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. बांगलादेश    कोलकाता१ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका    पुणे२ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर २    मुंबई३ नोव्हेंबर    क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान    लखनौ४ नोव्हेंबर    इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    अहमदाबाद४ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. पाकिस्तान    बंगळुरू५ नोव्हेंबर    भारत वि. दक्षिण आफ्रिका    कोलकाता६ नोव्हेंबर    बांगलादेश वि. क्वालिफायर २    दिल्ली७ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान    मुंबई८ नोव्हेंबर    इंग्लंड वि. क्वालिफायर १    पुणे९ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू१० नोव्हेंबर    द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान    अहमदाबाद११ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर १    बंगळुरू१२ नोव्हेंबर    इंग्लंड वि. पाकिस्तान    कोलकाता१२ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश    पुणे१५ नोव्हेंबर    पहिला उपांत्य सामना    मुंबई१६ नोव्हेंबर    दुसरा उपांत्य सामना    कोलकाता१७ नोव्हेंबर     राखीव दिवस    —————१९ नोव्हेंबर    फायनल     अहमदाबाद    २० नोव्हेंबर     राखीव दिवस    ——————

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत
Open in App