World Cup 2023 Warm-up match fixtures of Indian Team : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आज ICC ने जाहीर केले. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. पण, आता मुख्य फेरीतील या लढतीपूर्वी टीम इंडियाला २ सराव सामने खेळावे लागणार आहेत. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सराव सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या लढतीने सराव सामन्यांची सुरुवात होईल. हा सामना गुवाहाटी येथे होईल. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, तिरुअनंतपूरम आणि न्यूझीलंड वि. पाकिस्तान, हैदराबाद अशा लढती होतील. भारताला सराव सामन्यांत इंग्लंड व नेदरलँड्सचा सामना करावा लागणार आहे. गुवाहाटी येथे भारत-इंग्लंड लढत होईल, तर ऑस्ट्रेलिया-नेदरलँड्स यांच्यात तिरुअनंतपूरम येथे सामना होईल. या सर्व लढती भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून सुरू होतील आणि संघांना १५ खेळाडूंसह खेळता येणार आहे.
World Cup warm-up fixtures:२९ सप्टेंबर बांगलादेश वि. श्रीलंका, गुवाहाटीदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, तिरुअनंतपूरमन्यूझीलंड वि. पाकिस्तान, हैदराबाद
३० सप्टेंबरभारत वि. इंग्लंड, गुवाहाटीऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड्स, तिरुअनंतपूरम
२ ऑक्टोबर इंग्लंड वि. बांगलादेश, गुवाहाटीन्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, तिरुअनंतपूरम
३ ऑक्टोबरऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, गुवाहाटीभारत वि. नेदरलँड्स, तिरुअनंतपूरमपाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, हैदराबाद