ICC ODI World Cup England vs New Zealand Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एक वेगळा विक्रम झालेला पाहायला मिळाला... ४६५८ वन डे सामन्यांत आतापर्यंत जे कधीच घडले नव्हते, ते इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्या लढतीत घडले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना इंग्लंडला ९ बाद २८२ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. जो रूट ( Joe Root) आणि कर्णधार जोस बटलर यांचा अपवाद वगळला तर इंग्लंडच्या फलंदाजांनी निराश केले.
जॉनी बेअरस्टो ( ३३) आणि डेव्हिड मलान ( १४) यांनी विकेट फेकल्या. हॅरी ब्रूकला ( २५) घाई महागात पडली. मोईन अली ( ११)ने निराश केले. रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी ७० धावांची भागीदारी केली, परंतु मॅट हेन्रीने बटलरला ४३ ( ४२ चेंडू) धावांवर माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन ( २०) चुकीचा फटका मारून झेलबाद झाला. रूटचा संघर्षाला फिलिप्सने ब्रेक लावला. रूट ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७७ धावांवर त्रिफळाचीत झाला. इंग्लंडला ५० षटकांत ९ बाद २८२ धावा करता आल्या. मॅट हेन्रीने ३ विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनरने १०-०-३७-२ अशी स्पेल टाकली. ग्लेन फिलिप्सने ३ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. मॅट हेन्रीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
क्रिकेट इतिहासात प्रथमच सर्वच्या सर्व ११ फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले.
हे तुम्हाला माहित्येय का?
केव्हीन कुरन यांनी १९८५ व १९८७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते. आज त्यांचा मुलगा सॅम कुरन इंग्लंडकडून वर्ल्ड कप खेळतोय.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सहावी वडील-मुलाची जोडी ठरली. केव्हीन व सॅम या वडील-मुलाच्या जोडीने दोन वेगवेगळ्या देशांकडून वर्ल्ड कप खेळला आहे. यापूर्वी डॉन प्रिंग्ली १९७५ ( ईस्ट आफ्रिका) आणि डेरेक प्रिंग्ली १९८७ व १९९२ ( इंग्लंड) या वडील-मुलाच्या जोडीने वेगवेगळ्या देशांकडून वर्ल्ड कप खेळला होता
Web Title: World Cup ENG vs NZ Live : For the first time in World Cup history - All the 11 players scored runs in double digits, First such instance in the history of ODIs of 4658 matches.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.