World Cup ENG vs NZ Live : जो रूट एकटा भिडला; न्यूझीलंडसमोर गतविजेता इंग्लंड चाचपडला

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. गतविजेत्या इंग्लंडचे फलंदाज आज चाचपडताना दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:34 PM2023-10-05T17:34:41+5:302023-10-05T17:37:36+5:30

whatsapp join usJoin us
World Cup ENG vs NZ Live : Joe Root scored 77 in 86 balls with 4 fours and a six, England make 282/9!  | World Cup ENG vs NZ Live : जो रूट एकटा भिडला; न्यूझीलंडसमोर गतविजेता इंग्लंड चाचपडला

World Cup ENG vs NZ Live : जो रूट एकटा भिडला; न्यूझीलंडसमोर गतविजेता इंग्लंड चाचपडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. गतविजेत्या इंग्लंडचे फलंदाज आज चाचपडताना दिसले. जो रूट ( Joe Root) आणि कर्णधार जोस बटलर यांचा अपवाद वगळला तर इंग्लंडच्या फलंदाजांनी निराश केले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आज क्रेडीट द्यायला हवे की त्यांनी ३०० पार जाणाऱ्या खेळपट्टीवर गतविजेत्यांना रोखले. मॅट हेन्रीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

ढेंग्या खालून गेला चेंडू, जो रूटचा उडाला दांडू! इंग्लंडचा गड ढासळला, Video 


न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  जॉनी बेअरस्टो ( ३३) आणि डेव्हिड मलान ( १४) यांनी चांगली सुरूवात केली होती, परंतु किवी गोलंदाजांनी चतुराईने मारा केला अन् झटपट विकेट घेतल्या. हॅरी ब्रूकने ( २५) रवींद्र राचिनच्या षटकात आक्रमण करताना ४,४,६ असे फटके मारले, परंतु आणखी एक षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. ब्रूकने १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २५ धावा केल्या. मोईन अली ( ११)ने निराश केले. रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी ७० धावांची भागीदारी केली, परंतु मॅट हेन्रीने बटलरला ४३ ( ४२ चेंडू) धावांवर माघारी पाठवले.  ( ENG vs NZ Live Scorecard ) 

रूट एका बाजूने चांगला खेळ करत होता, परंतु समोरून त्याला साथ मिळताना दिसली नाही. लिएम लिव्हिंगस्टोन ( २०) ट्रेंट बोल्टच्या नकल बॉलवर झेलबाद झाला. रूटचा संघर्ष फिलिप्सने संपुष्टात आणला. रूट ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७७ धावांवर त्रिफळाचीत झाला. मिचेल सँटनरने १०-०-३७-२ अशी स्पेल टाकली. ग्लेन फिलिप्सने ३ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला ५० षटकांत ९ बाद २८२ धावा करता आल्या. मॅट हेन्रीने ३ विकेट्स घेतल्या.

Web Title: World Cup ENG vs NZ Live : Joe Root scored 77 in 86 balls with 4 fours and a six, England make 282/9! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.