Join us  

World Cup ENG vs NZ Live : जो रूटने किवी गोलंदाजांना 'वेड' लावलं; ट्रेंट बोल्टला षटकार असा खेचला की... Video

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 3:21 PM

Open in App

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये नाट्यमय सामना रंगला होता आणि केवळ चौकार जास्त म्हणून इंग्लंडला विजेतेपद दिले गेले होते. त्यानंतर पुन्हा वर्ल्ड कपमध्ये समारोसमोर उभय संघ आल्याने सर्वच उत्सुक होते, परंतु अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तुरळक प्रेक्षकसंख्या पाहून सारेच चक्रावले. 

न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाही. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्स दुखापतीमुळे आज खेळत नाही. पण, दोन्ही संघांमध्ये चांगली स्पर्धा सुरू आहे. इंग्लंडला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले आहेत. मात्र, जो रुटने ( Joe Root) अप्रतिम स्कूप मारून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना येड लावले... जॉनी बेअरस्टोने षटकाराने इंग्लंडच्या डावाची सुरुवात करून दिली आणि डेव्हिड मलाननेही चांगली साथ दिली. किवींनी सातव्या षटकात फिरकीपटू मिचेल सँटरनरला गोलंदाजीला आणले आणि त्या षटकात मलानचा यष्टिरक्षकाकडून झेल सुटला. 

मॅट हेन्रीने ८व्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान ( १४) याला झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर सँटनरने इंग्लंडला दुसरा धक्का देताना जॉनी बेअरस्टोला ( ३३) बाद केले.  ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रुटने मारलेला स्कूप अविश्वसनीय होता. त्याने षटकार खेचला. हॅरी ब्रूकने रवींद्र राचिनच्या षटकात आक्रमण करताना ४,४,६ असे फटके मारले, परंतु आणखी एक षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. ब्रूकने १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २५ धावा केल्या आणि इंग्लंडला ९४ धावांवर तिसरा धक्का बसला.

इंग्लंडचा संघ - जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रुट, हॅरी ब्रुक, जोस बटलर, मोईन अली, लिएम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, सॅम कुरन, आदील राशिद, मार्क वूड.

न्यूझीलंडचा संघ - डेव्हॉन कॉवने, विल यंग, रवींद्र राचिन, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅम्पमन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडन्यूझीलंडजो रूट