World Cup ENG vs NZ Live : पदार्पण गाजवले! राचिन रवींद्रने इंग्लंडला नाचवले; सचिन + राहुल असं ठेवलंय नाव 

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : न्यूझीलंडच्या राचिन रविंद्र ( Rachin Ravindra) आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:06 PM2023-10-05T19:06:26+5:302023-10-05T19:06:59+5:30

whatsapp join usJoin us
World Cup ENG vs NZ Live : Rachin Ravindra! A stunning 36-ball half-century on his World Cup debut, know about him | World Cup ENG vs NZ Live : पदार्पण गाजवले! राचिन रवींद्रने इंग्लंडला नाचवले; सचिन + राहुल असं ठेवलंय नाव 

World Cup ENG vs NZ Live : पदार्पण गाजवले! राचिन रवींद्रने इंग्लंडला नाचवले; सचिन + राहुल असं ठेवलंय नाव 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : न्यूझीलंडच्या राचिन रविंद्र ( Rachin Ravindra) आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले... त्यांचे फटके पाहण्यासारखे होते. वर्ल्ड कप पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या राचिनने सळो की पळो करून सोडले. त्याने ३७ चेंडूंत अर्धशतक झळकावले, तर कॉनवनेही ३६ चेंडूत फिफ्टी पूर्ण केली. 

४६५८ सामन्यांत न घडलेला विक्रम वर्ल्ड कपच्या पहिल्याच लढतीत झाला, स्कोअरबोर्ड नीट पाहा

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना इंग्लंडला ९ बाद २८२ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.जॉनी बेअरस्टो ( ३३) आणि डेव्हिड मलान ( १४) यांनी विकेट फेकल्या. हॅरी ब्रूकला ( २५) घाई महागात पडली. मोईन अली ( ११)ने निराश केले. रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी ७० धावांची भागीदारी केली, परंतु मॅट हेन्रीने बटलरला ४३ ( ४२ चेंडू) धावांवर माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन ( २०) चुकीचा फटका मारून झेलबाद झाला. रूटचा संघर्षाला फिलिप्सने ब्रेक लावला. रूट ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७७ धावांवर त्रिफळाचीत झाला.  मॅट हेन्रीने ३ विकेट्स घेतल्या. क्रिकेट इतिहासात प्रथमच सर्वच्या सर्व ११ फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले.  ( ENG vs NZ Live Scorecard ) 

डेव्हॉन कॉवनेने पहिल्याच षटकात दोन चौकार खेचून चांगली सुरूवात करून दिली, परंतु विल यंगने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट टाकली. सॅम कुरनने ही विकेट घेतली. पण, बढती मिळालेल्या राचीन रवींद्रने कॉनवेसह इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच फटकवून काढले. मार्क वूडच्या पहिल्याच षटकात राचिनने १७ धावा चोपल्या आणि त्याने कॉनवेसह ४० चेंडूंत पन्नास धावांची भागीदारी पूर्ण केली. कॉनवे आणि रवींद्र यांच्या फटकेबाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले. राचिनने ३७ चेंडूंत वर्ल्ड कप पदार्पणात अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडने १२ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. 


 

कोण आहे राचिन रवींद्र?
राचिनचे वडिल रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. बऱ्याच वर्षांपासून ते न्यूझीलंडमध्येच आहेत. राचिनचा जन्मही न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. रवि कृष्णमूर्ती हे बंगळुरू येथील सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट होते. न्यूझीलंडमधील हट हॉक्स क्लबचे संस्थापक रवींद्र यांचे वडील रवी कृष्णमूर्ती १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून स्थलांतरित झाले आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.  
कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. राचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर   आणि राहुल द्रविडचे  चाहते असलेल्या राचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'राचिन' ठेवले.
 

Web Title: World Cup ENG vs NZ Live : Rachin Ravindra! A stunning 36-ball half-century on his World Cup debut, know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.