World Cup ENG vs NZ Live : भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रने इतिहास रचला, डेव्हॉन कॉनवे पहिला शतकवीर ठरला

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे आणि राचिन रवींद्र हे इंग्लंडसाठी आज कर्दनकाळ ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:14 PM2023-10-05T20:14:50+5:302023-10-05T20:16:15+5:30

whatsapp join usJoin us
World Cup ENG vs NZ Live :  Rachin Ravindra & Devon Conway score century; Rachin became a New Zealand's fastest-ever men's ODI World Cup 100 - 82 balls | World Cup ENG vs NZ Live : भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रने इतिहास रचला, डेव्हॉन कॉनवे पहिला शतकवीर ठरला

World Cup ENG vs NZ Live : भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रने इतिहास रचला, डेव्हॉन कॉनवे पहिला शतकवीर ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे आणि राचिन रवींद्र हे इंग्लंडसाठी आज कर्दनकाळ ठरले. न्यूझीलंडच्या या डावखुऱ्या फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. डेव्हॉन कॉनवे यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला शतकवीर ठरला. त्याने ८३ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ राचिनने ८२ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. 

पदार्पण गाजवले! राचिन रवींद्रने इंग्लंडला नाचवले; सचिन + राहुल असं ठेवलंय नाव 


डेव्हॉन कॉवनेने पहिल्याच षटकात दोन चौकार खेचून चांगली सुरूवात करून दिली, परंतु विल यंगने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट टाकली. सॅम कुरनने ही विकेट घेतली. पण, बढती मिळालेल्या राचीन रवींद्रने कॉनवेसह इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच फटकवून काढले. मार्क वूडच्या पहिल्याच षटकात राचिनने १७ धावा चोपल्या. कॉनवे आणि रवींद्र यांच्या फटकेबाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले. राचिनने ३७ चेंडूंत वर्ल्ड कप पदार्पणात अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ कॉवनेही ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून शतकी भागीदारी पूर्ण केली. ज्याप्रमाणे भारताने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांना आघाडीवर फलंदाजीला पाठवले तसाच राचिनला पुढच्या क्रमांकावर पाढवायचा न्यूझीलंडचा निर्णय हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो, असे मत रवी शास्त्री यांनी समालोचन करताना मांडले. 

Image
१९९६मध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर नॅथन अॅस्टेलने वर्ल्ड कप पदार्पणात शतक झळकावलेले ( वि. इंग्लंड, अहमदाबाद) आणि आज २०२३ मध्ये कॉनवे यानेही त्याच्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात इंग्लंडविरुद्धच शतक झळकावले.  न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम कॉनवेने नावावर केला. राचिनने हा विक्रम मोडला आणि ८२ चेंडूंत शतक झळकावले. न्यूझीलंडने ३१ षटकांत १ बाद २२२ धावा केल्या आहेत. 

 

Web Title: World Cup ENG vs NZ Live :  Rachin Ravindra & Devon Conway score century; Rachin became a New Zealand's fastest-ever men's ODI World Cup 100 - 82 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.