IND vs AUS World Cup 2023 Final : १९ तारखेला आयसीसी वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. मागील जवळपास दोन महिन्यापासून चाहत्यांचे मनोरंजन करणारी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम सामना जिंकणारा संघ जगज्जेता होईल, तर हरणारा संघ उपविजेता मानला जाईल. या विश्वचषकाच्या समाप्तीनंतर प्रत्येक संघाला बक्षीस रक्कम दिली जाईल. विश्वविजेत्या संघावर सर्वाधिक पैशांचा पाऊस होईल तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला बक्षीस म्हणून ठराविक रक्कम मिळेल.
कोणाला किती बक्षीस मिळणार?
- विश्वचषक विजेत्या संघाला ३३ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
- उपविजेत्या संघावर १६.६४ कोटी रकमेचा पाऊस होईल.
- उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या संघांना म्हणजेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना सुमारे ६.६० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
- साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या संघांना ८३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
- तसेच साखळी फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला ३३ लाख रुपये बोनस म्हणून दिले जातील.
भारताचा दबदबान्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. अर्थात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला.