ख्राईस्टचर्च : बलाढ्य आॅस्ट्रेलियाने अपेक्षित विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानला सहा बळींनी पराभूत करीत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह अफगाणिस्तानच्या युवा संघाची स्वप्नवत वाटचाल खंडित झाली.स्पर्धेत चमकदार कामगिरीसह आपली छाप पाडलेल्या अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांची मजल मारली. मात्र, तीन वेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या आॅस्ट्रेलियासाठी हे आव्हान कठीण नव्हते. यष्टिरक्षक फलंदाज इकराम अली खिल याने ११९ चेंडूंत ८० धावांची खेळी केल्याने अफगाणिस्तानला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. यानंतर आॅस्ट्रेलियाने ७५ चेंडू शिल्लक ठेवत बाजी मारली. सलामीवीर जॅक एडवडर््स याने ७२ धावा फटकावल्या.दरम्यान, आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केलेल्या आॅफस्पिनर मुजीब जदरान याने सलामीवीर मॅक्स ब्रायंट (४) याला बाद करून कांगारुंना सुरुवातीला धक्का दिला. कर्णधार जेसन सिंघा (२६) आणि जोनाथन मेरलो (१७) हेही स्वस्तात बाद झाल्याने कांगारू अडचणीत आले. मात्र, पवन उप्पल (३२) आणि नॅथन मॅकस्वीन (२२) यांनी संघाला विजय मिळवून दिला. दोघांनी पाचव्या बळीसाठी ५३ धावांची भागीदारी केली.याआधी अफगाणिस्तान संघाकडून कोणीही मोठी भागीदारी करू शकला नाही. अली खिल याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये ८ चौकारांसह ८० धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. आॅस्टेÑलियाच्यामेरलो याने १० षटकांत केवळ २४ धावा देत ४ बळी घेतले. जॅक इवान्स यानेदोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- १९ वर्षांखालील विश्वचषक : आॅस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक
१९ वर्षांखालील विश्वचषक : आॅस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक
बलाढ्य आॅस्ट्रेलियाने अपेक्षित विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानला सहा बळींनी पराभूत करीत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह अफगाणिस्तानच्या युवा संघाची स्वप्नवत वाटचाल खंडित झाली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:56 AM