भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!

गौतम गंभीर आणि युवराज सिंग यानंही त्याचं कौतुक केलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:08 PM2020-07-29T14:08:34+5:302020-07-29T14:09:00+5:30

whatsapp join usJoin us
World Cup winning bowler Munaf Patel open COVID-19 centre in his village | भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 15 लाख 35,335 झाली असून त्यापैकी 9 लाख 89, 878 रुग्ण बरे झाले आहेत. पण, दुर्दैवानं 34,252 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणांपासून सर्वच झटत आहेत. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींनी केंद्र व आपापल्या राज्य सरकारला आर्थिक मदत करून त्यांची जबाबदारी पार पाडली. पण, भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य स्वतः मैदानावर उतरून कोरोना रुग्णांची मदत करत आहे. भारतीय संघाच्या या सदस्यानं गावकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून देताना गावात कोव्हिड सेंटर उघडलं आहे.

भारतीय संघाचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल हा भरुच जिल्ह्यातील इकहर गावचा रहिवासी आहे. त्यानं गावात कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे. बाहेरुन गावात आलेल्यांना, तसेच करोनाची सौम्य लक्षणं आढळलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी त्यानं गावकऱ्यांच्या मदतीनं कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे. क्वारंटाईन झालेल्या लोकांच्या जेवणाची सर्व सोय मुनाफ करत आहे. यासाठी तो सातत्यानं जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे.  




 
मुनाफनं 13 कसोटी, 70 वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना अऩुक्रमे 35, 86 आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

'उल्टा चष्मा'मधल्या जेठालालची 'बबिता' होती पाकिस्तानी खेळाडूच्या प्रेमात! 

KKRला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; प्रथम श्रेणीत 6482 धावा अन् 137 विकेट्स!

शॉक लगा... पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत घेतला सेल्फी, नंतर माहीत पडलं त्याला कोरोना झालाय!

एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!

IPL 2020: 125 भारतीय खेळाडू कमावणार 358 कोटी, तर 62 परदेशी खेळाडूंना मिळणार 197 कोटी!

Web Title: World Cup winning bowler Munaf Patel open COVID-19 centre in his village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.