आज जागतिक पर्यावरण दिवस... प्रगती, विकास, पैसा हे सर्व मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सातत्यानं निसर्गाला हानी पोहोचवत आलो आहोत. पण, आता लॉकडाऊनमुळे लोकांना घरी बसवलं आहे आणि प्राणी-पक्षी मोकळा श्वास घेताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतरही हेच चित्र कायम राखण्याचं आवाहन टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मानं आज सर्वांना केलं.
तो म्हणाला,''या जागतिक पर्यावरण दिनी मनाची कवाडं उघडूया.. मोकळं निळ आकाश, आपल्या बालकनीत पक्षांचा किलबिलाट आणि रस्त्यावर फिरणारे प्राणी, यांचं स्वागत करूया. आता निसर्गाची वेळ आहे. आता हे चित्र असंच कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. चला तर सर्वांनी एकत्र येऊन निसर्गाचं रक्षण करूया. आपल्या भावी पिढीसाठी.''
पाहा व्हिडीओ...
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!